रुग्णांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा आता ‘व्हॉट्सअप’वर होणार महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते. तर चला मग माहिती समजून घेण्यासाठी पूर्ण वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा व अशाच नवनवीन सरकारी योजनांविषयी माहितीसाठी आमच्या वेबसाइट jobandschemes.com ला भेट द्या व आमच्या या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनेलला सुद्धा जॉईन होऊ शकता.अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला ज्वाइन व्हा.
Mukhyamantri Sahayata Nidhi Update 2025
🪀 आता WhatsApp वर मिळवा जॉब अपडेट्स व महत्वपूर्ण माहिती त्यासाठी जॉईन करा 👇🏻
https://chat.whatsapp.com/JXQr9dKaSw1BOs2qRNyelW
━━━━━━━━━━━━━
मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज – PDF Download
Mukhyamantri Sahayata Nidhi Update 2025
➡️ राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत करार केला आहे.
➡️ त्यानुसार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आरोग्य विषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
➡️ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक तरतूद वाढवण्यासाठी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मधून निधी घ्यावा. त्यासाठी एक संस्था स्थापन करावी.
➡️ ही संस्था सीएसआर निधी मिळवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नागरिकांच्या सेवेसाठी उपयोगात आणेल. संस्था मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सीएसआर यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करेल.
➡️ मुख्यमंत्री सहाय्यता निधीची सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence-AI) उपयोग करण्यात यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
➡️ रुग्ण सेवेत येत असलेल्या अडचणींवर मात करत रुग्ण सेवेसाठी निधीचा जास्तीत जास्त उपयोग करावा. यासाठी रुग्णालयांची संलग्नता वाढवून जास्तीत जास्त रुग्णालये पॅनेल करण्यात यावी.
➡️ मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा जन आरोग्य योजना, पंतप्रधान आयुष्मान भारत योजना यापैकी रुग्णाला कुठल्या योजनेचा लाभ मिळेल, यापूर्वी घेतलेला लाभ, कुठल्या आजारावर किती लाभ मिळाला, याबाबत सर्व माहीत पोर्टलवर असावी.
➡️ गरजूला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी पारदर्शकता आणावी. तालुकानिहाय रुग्णमित्र नियुक्त करावे. निधीबाबत सुधारित पोर्टल आणि टोल फ्री क्रमांक तयार करण्यात यावा. पोर्टलवर जियो टॅगिंग उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना ‘लोकेशन’ नुसार जवळचे रुग्णालय शोधत उपचारासाठी सहज दाखल होता येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
➡️ मुख्यमंत्री सहायता निधी योजने अंतर्गत राज्यात 31 मार्च 2025 पर्यंत 7 हजार 658 रुग्णांना 67 कोटी 62 लाख 55 हजार रुपयांची आर्थिक मदत कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मुख्यमंत्री सहायता निधी योजने अंतर्गत आजार
- हृदयदरोग
- मेंदूरोग
- नवजात बालके
- मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रत्यारोपण
- यकृत प्रत्यारोपण
- कर्करोग
- अपघात
- डायलिसिस
- हृदयप्रत्यारोपण
- CVA
- Bone Marrow Transplant या 11 गंभीर आजारांसाठी आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकिय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.
मुख्यमंत्री सहायता निधी रुग्णालयांची यादी – PDF
मुख्यमंत्री सहायता निधी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी.
• Email id – aao.cmrf-mh@gov.in –
- अर्ज (विहीत नमुन्यात)
- वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
- तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. 1.60लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
- रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
- रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
- संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
- रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
- अपघात असल्यास, FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे.
- अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.
अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवून त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.1) हृदययरोग, २) मेंदूरोग, 3) नवजात बालके, 4) मूत्रपिंड प्रत्यारोपण, 5) यकृत प्रत्यारोपण, 6) कर्करोग, 7) अपघात, 8) डायलिसिस, 9) हृदयप्रत्यारोपण, 10) CVA व 11) Bone Marrow. Transplant या 11 गंभीर आजारांसाठी
🙏कृपया ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद
हे पण वाचा – विवाह नोंदणी प्रमाणपत्र 2025 मध्ये कसे काढायचे कोणती कागदपत्रे लागतील