SECR Recruitment 2025 : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

SECR Recruitment 2025 : दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; कोणत्याही परीक्षेविना होणार निवड

SECR Recruitment 2025

SECR Recruitment 2025 : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या भरती अंतर्गत एकूण 1007 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. येथे तुम्हाला अर्जाशी संबंधित तपशीलवार माहिती मिळेल. सदर भरती बाबतची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी माहिती पूर्ण वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा व अशाच नवनवीन रोजगारआणि सरकारी योजनांविषयी माहितीसाठी आमच्या वेबसाइट jobandschemes.com ला भेट द्या व आमच्या या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनेलला सुद्धा जॉईन होऊ शकता.अशाच रोजगार आणि नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनेलला ज्वाइन व्हा.

SECR Recruitment 2025 : रेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणा-या शिकाऊ उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ पदांसाठी भरती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailway.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत एकूण 1007 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवशयक आहे. येथे तुम्हाला अर्जाशी संबंधित तपशीलवार तपशील मिळतील. त्याची थेट लिंक खाली देण्यात आली आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) शिकाऊ भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 10 वी किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असले पाहिजेत. याशिवाय संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणेही बंधनकारक आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा :

सदर भरती अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय 5 एप्रिल 2025 रोजी किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय संबंधित जाहिरात बाबत अधिक माहितीसाठी, कृपया अधिसूचना वाचा.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड दहावी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. दोन्ही गुणांना 50-50 टक्के वेटेज दिले जाईल. याशिवाय, ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, ज्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्राचा समावेश असू शकतो.

SECR भरती 2025 शिकाऊ उमेदवाराचा कालावधी :

सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवार ज्यांची निवड शिकाऊ भरतीसाठी केली जाईल. त्यांना निश्चित कालावधीसाठी प्रशिक्षणासाठी ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक ट्रेडसाठी 1 वर्षाच्या कालावधीसाठी शिकाऊ प्रशिक्षण घेतले जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Sout East Central Railway Recruitment 2025 Last Date)

रेल्वेतील भरती प्रक्रियेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 मे 2025 आहे.

ट्रेड नुसार तपशील:

अ.क्र. ट्रेड  पद संख्या
नागपूर विभाग 
1  फिटर 66 जागा
2  कारपेंटर 39 जाग
3 वेल्डर 17 जागा
4 COPA 170 जागा
5 इलेक्ट्रिशियन 253 जागा
6 स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट 20 जागा
7 प्लंबर 36 जागा
8 पेंटर 52 जागा
9 वायरमन 42 जागा
10 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 12 जागा
11 डीझेल मेकॅनिक 110 जागा
12 उपहोलस्टेरेर (ट्रिमर) 0 जागा
13 मशिनिस्ट 05 जागा
14 टर्नर 07 जागा
15 डेंटल लॅब टेक्निशियन 01 जागा
16 हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन 01 जागा
17 हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर 01 जागा
18 गॅस कटर 00 जागा
19 स्टेनोग्राफर (हिंदी) 12 जागा
20 केबल जॉइंटर 21 जागा
21 डिजिटल फोटोग्राफर 03 जागा
22 ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV) 03 जागा
23 MMTM 12 जागा
24 मेसन 36 जागा
Total 919 जागा
मोतीबाग वर्कशॉप 
1 फिटर 44 जागा
2 वेल्डर 09 जागा
3  कारपेंटर 00 जागा
4 पेंटर 00 जागा
5 टर्नर 04 जागा
6 सेक्रेटरिअल स्टेनो 00 जागा
7 इलेक्ट्रिशियन 18 जागा
8 COPA 13 जागा
Total 88 जागा
Grand Total 1007 जागा

 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) फी :

सदर भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास कोणत्याही प्रकारची फी नाही

माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.