Loco Pilot Bharati 2025 – ALP भरती 2025

RRB LOCO PILOT BHARATI 2025: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 9970 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी होणार भरती; लवकर करा अर्ज!

रेल्वे भरती बोर्डाद्वारे असिस्टंट लोको पायलट भरती 2025 अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही नोंदणीची तारीख आणि रिक्त 9970 पदांसाठी ऑनलाइन अर्ज फॉर्मची सर्व माहिती पाहू शकता आणि तुमचा आँनलाईन अर्ज करू शकता उमेदवाराची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया, पात्रता निकष यासारखी सर्व माहिती येथे पाहू शकता. त्यासोबतच प्रत्येक झोनसाठी रिक्त जागांचा अहवाल सुद्धा पाहू शकता. सदर भरती बाबतची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी माहिती पूर्ण वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा व अशाच नवनवीन रोजगारआणि सरकारी योजनांविषयी माहितीसाठी आमच्या वेबसाइट jobandschemes.com ला भेट द्या व आमच्या या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनेलला सुद्धा जॉईन होऊ शकता.अशाच रोजगार आणि नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनेलला ज्वाइन व्हा.

Loco Pilot Bharati 2025 - ALP भरती 2025

रेल्वे भरती बोर्डाद्वारे RRB रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी पदभरती होणार असून सदर जाहिरातीद्वारे 9970 रिक्त पदांसाठी सदर जाहिरात ही प्रस्तुत करण्यात आलेली आहे.

रेल्वे भरती बोर्डद्वारे 9970 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 एप्रिल पासून सुरू करणार आहे.
RRB ALP 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने जारी केलेल्या अधिसुचनेनुसार असिस्टंट लोको पायलटच्या नवीन जागांसाठी भरती केली जाणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) 12 एप्रिल पासून असिस्टंट लोको पायलट (ALP) रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करेल. उमेदवार त्यांच्या संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा पोस्टसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करू शकतात.

RRB ALP 2025 : रिक्त पदांची तपशील

रेल्वेत नवीन भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील लाखो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत रेल्वे भरती मंडळाने देशभरातील विविध झोनमध्ये असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या 9900 हून अधिक पदांच्या भरतीसाठी छोटी सूचना (CEN 01/2025) जारी केली आहे. अधिसुचनेनुसार पे मॅट्रिक्स लेव्हल 2 अंतर्गत भरती केली जाणार आहे.

RRB ALP 2025 : अर्ज करण्याची तारीख

रेल्वे भर्ती बोर्डाने जारी केलेल्या असिस्टंट लोको पायलटच्या नवीन भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार शनिवार 12 एप्रिल 2025 पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 निश्चित करण्यात आली आहे.

RRB ALP 2025 : वयोमर्यादा:

1 जुलै 2025 रोजी 18-30 वर्षे वयोगटातील उमेदवार असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

RRB ALP 2025 : पात्रता निकष

अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक (10वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. 1 जुलै 2025 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी आणि इतर तपशिलांसाठी अधिसूचना पहा

RRB ALP 2025 निवड प्रक्रिया:

भरती प्रक्रियेमध्ये पाच टप्प्यांचा समावेश आहे:

  1. पहिला टप्पा संगणक आधारित चाचणी (CBT 1),
  2. दुसरा टप्पा (CBT 2), संगणक आधारित
  3. तिसरा टप्पा अभियोग्यता चाचणी (CBAT),
  4. चौथा टप्पा दस्तऐवज पडताळणी (DV)
  5. पाचवा टप्पा वैद्यकीय परीक्षा (ME).

असिस्टंट लोको पायलट जाहिरात 2025 रिक्त पदांचा तपशिल

  1. उत्तर पूर्व रेल्वे – 100 जागा
  2. पूर्वोत्तर तटीय रेल्वे – 125 जागा
  3. मेट्रो रेल्वे कोलकत्ता – 225 जागा
  4. मध्य रेल्वे – 376 जागा
  5. उत्तर मध्य रेल्वे – 508 जागा
  6. दक्षिण रेल्वे – 510 जागा
  7. उत्तर रेल्वे – 521 जागा
  8. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे – 568 जागा
  9. उत्तर पश्चिम रेल्वे – 679 जागा
  10. पूर्व मध्य रेल्वे – 700 जागा
  11. पश्चिम मध्य रेल्वे – 759 जागा
  12. पूर्व रेल्वे – 768 जागा
  13. दक्षिण पूर्व रेल्वे – 796 जागा
  14. पश्चिम रेल्वे – 885 जागा
  15. दक्षिण मध्य रेल्वे – 989 जागा
  16. पूर्व तटीय रेल्वे – 1461 जागा
  17. एकूण जागा – 9970

RRB ALP 2024 : ऑनलाइन अर्जाची लिंकhttps://www.recruitmentrrb.in/#/auth/landing
RRB ALP 2024 : अधिसुचनाhttps://drive.google.com/file/d/1K9Os9wOxVnSmOFzG9uTs3aCMsLjmX3zn/view

RRB ALP 2024 : अर्ज शुल्क

RRB ने या भरतीसाठी अर्ज शुल्क 500 रुपये ठेवले आहे. पण , SC/ST, EWS, माजी सैनिक तृतीयपंथी आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी शुल्क फक्त 250 रुपये आहे. ऑनलाइन अर्ज करताना शुल्क भरावे लागेल.

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना त्यांच्या निवासस्थानाच्या संबंधित झोनसाठी रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल (उदा. – RRB गोरखपूर, RRB पटना, RRB मुंबई, RRB सिकंदराबाद, RRB चेन्नई, इ.). तपशीलवार अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.

4 thoughts on “Loco Pilot Bharati 2025 – ALP भरती 2025”

  1. रेल्वे भरतीच्या या जाहिरातीमुळे लाखो उमेदवारांना आशेचा किरण दिसतोय. असिस्टंट लोको पायलट पदासाठी ९९७० जागा म्हणजे एक मोठी संधी आहे. पण, अर्ज करण्याच्या प्रक्रियेत काही गुंतागुंत वाटते का? वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता यांच्याबद्दल स्पष्टता आहे, पण प्रत्येक झोनसाठीच्या प्रक्रियेत काही फरक आहे का? SC-ST, EWS, महिला उमेदवारांसाठी शुल्कात सवलत हे खरच प्रशंसनीय आहे. पण, ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ शकते का? अधिसूचनेमध्ये दिलेल्या तपशिलांवरून अधिक माहिती मिळेल, पण काही गैरसमज टाळण्यासाठी काय करावे? या भरतीत यश मिळविण्यासाठी उमेदवारांनी कोणती तयारी करावी?

    Reply
    • सदर भरती अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ येईल तेव्हा साईट स्लो होऊ शकते कारण जास्तीत जास्त विद्यार्थी अर्ज हे शेवटची तारीख जवळ येते तेव्हा करीत असतात.

      Reply
  2. रेल्वे भरतीची ही जाहिरात खरोखरच उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. 9970 पदांसाठीची भरती ही एक मोठी संधी आहे, विशेषत: तरुणांसाठी. पण, अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल काही गोंधळ आहे का? उदाहरणार्थ, ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ शकते का? शिवाय, SC-ST, EWS आणि महिला उमेदवारांसाठी शुल्कात सवलत देण्याचा निर्णय खूपच सराहनीय आहे. पण, या सवलतींच्या अधिक तपशीलांबद्दल काही माहिती आहे का? अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सर्व उमेदवारांनी त्यांचे दस्तऐवज तयार ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला वाटते का की या भरतीमुळे रेल्वे क्षेत्रातील गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढेल?

    Reply
  3. रेल्वे भरती बोर्डाची ही जाहिरात खरोखरच उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. 9970 पदांसाठीची भरती ही एक मोठी संधी आहे, विशेषत: तरुणांसाठी. पण, अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल काही गोंधळ आहे का? मला वाटते की वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता याबद्दल अधिक स्पष्टीकरण आवश्यक आहे. SC-ST, EWS आणि महिला उमेदवारांसाठी शुल्कात सवलत ही एक चांगली कल्पना आहे, पण हे शुल्क ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया सोपी आहे का? अर्ज करण्यासाठी वेबसाइटवर जाण्याची गरज आहे, पण काही उमेदवारांना तंत्रज्ञानाच्या बाबतीत अडचण येऊ शकते का? मला वाटते की या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना पुरेशी माहिती आणि मदत मिळावी. तुमच्या मते, या भरतीत सहभागी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?

    Reply

Leave a Comment